बाबासाहेब जिंदाबाद
किर्तिवंत तू जगी दिव्य प्रभा रत्न
सफल केले जिद्दीने सारे तू प्रयत्न
तुझी विचारधारा अखंडतेचा नारा
आसमंती घुमे हा निनाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद
बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद
जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद…
शेतकरी कामगार दिन दुबळा तुझ्याच पाठी
महिलांना आवाज दिला सोडवून रूढीच्या गाठी
शेतकरी कामगार दिन दुबळा तुझ्याच पाठी
महिलांना आवाज दिला सोडवून रूढीच्या गाठी
नदी जोड प्रकल्प तुझा पाण्याच्या नियोजनासाठी
रूपयाच्या प्रश्नांचे सारे उत्तर तुझ्याच हाती
नव्या दिशेचा आधुनिक भारत
तोच आंबेडकरवाद स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद
बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद
जिंदाबाद
सत्याग्रही दर्जेदार भाषण हे तुझ्या आज ओठी
संपविण्या जातीवादाला लावलीस ज्ञानाची कसोटी
सत्याग्रही दर्जेदार भाषण हे तुझ्या आज ओठी
संपविण्या जातीवादाला लावलीस ज्ञानाची कसोटी
प्रेम बंधु भाव सदा बुद्धाशी जोडतो नाती
मानवते साथी लढा शिकविते संघर्ष ख्याती
ओढतो अविरत प्रगतीचा हा रथ
बुद्धिशी साधुनी संहार
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद
बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद
बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद
💙💙💙